Media

NEWS


बुद्धिबळ स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी पीसीसीओई महाविद्यालयास सांघिक विजेतेपद

पिंपरी (दि. 07 ऑक्टोबर 2017) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) आंतर महाविद्यालय बुध्दीबळ स्पर्धेत सलग तिस-या वर्षी सांघिक विजेतेपद पटकावून हॅक्ट्रीक केली. पुणे जिल्हा क्रीडा विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने लोणिकंद येथील श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत पीसीसीओई संघाने सर्वाधिक 28 गुण मिळवून विजय मिळविला. तसेच वैयक्तिक श्रेणीत पीसीसीओईचाच खेळाडू नितीन बदोनी याने 8 गुण मिळवून व्दितीय क्रमांक मिळविला. तसेच त्याची पुढिल आंतरविभागीय स्पर्धेसाठी पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या संघात निवड झाली. सांघिक श्रेणीमध्ये पुणे जिल्ह्यातील 48 महाविद्यालयांच्या संघांनी व वैयक्तिक श्रेणीमध्ये 190 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

Read More..

induction

Singapore Education tour organised by Sakal Educon (24-09-2017 Saptarang Supplement)

फ्रान्स, सिंगापूर, इस्राईलसारख्या देशांमध्ये होतात, तसे प्रयोग आपल्याकडेही उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात व्हायला हवेत. उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारण्यांनी मतभेद, ‘स्व’चा आग्रह बाजूला ठेवून शिक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी एकत्र यायला हवं. आपल्या देशातल्या उद्योगांना हवे असणारे अभ्यासक्रम तयार करण्यात विद्यापीठं आणि उद्योगांनी एकमेकांना सहकार्य करायला हवं. उद्योगांनीही शिक्षक आणि विद्यार्थी अशा दोन्ही भूमिकांचा विचार करताना धोरण म्हणून महाविद्यालयं, विद्यापीठांमधल्या संशोधनाला आर्थिक मदत करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. सिंगापूरमध्ये नुकत्याच झालेल्या ‘एज्युकॉन’ परिषदेच्या निमित्तानं विचारमंथन.

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा त्यांना जास्तीत जास्त उपयोग व्हावा, पर्यायानं देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी आणि देशवासीयांचं जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न सकारात्मक दिशेनं जावेत यासाठी उच्चशिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि उद्योजकांमध्ये संवाद असण्याची गरज नेहमीच व्यक्त केली जाते. त्याबाबत काही प्रयत्न होतही असतात. ‘सकाळ माध्यमसमूहा’नं ‘एज्युकॉन’ परिषदा आयोजित करायला सुरवात केली, त्यावेळी याच संवादात्मक विचारविनिमयाची आवश्‍यकता ही मूळ प्रेरणा होती. समाजाच्या हितासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांनी हातात हात घालून काम करण्याच्या कल्पनेला शिक्षणाच्या क्षेत्रात मूर्त स्वरूप मिळालं ते ‘एज्युकॉन’च्या रूपानं. प्रश्‍न मांडण्याबरोबरच प्रश्‍नांना उत्तरं शोधण्यातही रस असणाऱ्या माध्यमसमूहानं यात पुढाकार घेतला, हेही या परिषदांचं एक वेगळेपण होतं. आज एक तप उलटून गेलं आहे. ‘एज्युकॉन’ परिषद सातासमुद्रापार गेली, त्यालाही आता एक दशक झालं आहे. उच्चशिक्षण क्षेत्रात जगभर चाललेले प्रयोग, जगभरातल्या यशस्वी विद्यापीठांनी आणि उद्योगांनी स्वीकारलेल्या नव्या वाटांचा आपल्याला परिचय व्हावा; जगात जे चांगलं आहे, त्यातलं आपल्याला काय स्वीकारता येईल, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर आणि उच्चशिक्षणाची गुणवत्ता यांची सांगड कशी घालता येईल यावर विचार व्हावा, हा हेतू ‘एज्युकॉन’चं आयोजन बाहेरच्या देशांमध्ये करण्यामागं होता. पॅरिस, तेल अविव, इस्तंबूल, क्वालालंपूर, शांघाय, दुबई अशा शिक्षणासाठीही जगभर नावाजलेल्या शहरांमधली विद्यापीठं, संशोधन संस्था, काही महत्त्वाचे उद्योग यांना भेटी देऊन त्यांनी केलेले बदल, शोधलेल्या नव्या वाटा समजून घेता आल्या.

Read More..

induction

एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये उद्योजकता परिचय शिबिराचे आयोजन

पिंपरी ( दि. 12 सप्टेंबर 17) उत्तम संघटन कौशल्य अंगी असणारा वास्तुविशारद उत्कृष्ठ कलाकृती निर्माण करु शकतो. सर्व घटकांनी सांघिक समर्पण भावनेने तयार केलेली वास्तू अजरामर ठरते असे मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तूविशारद (आर्किटेक्चर) उदय कुलकर्णी यांनी केले.

निगडी येथील पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच तीन दिवसीय उद्योजकता परिचय शिबिराचे आयोजनकरण्यात आलेले होते. या शिबिरा मध्ये एमबीए मधील १०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

एसबीपीआयएमचे संचालक डॉ. डेनिअल पेणकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणा मध्ये उद्योजकता विकासाचे महत्व विशद करून यशस्वी व अयशस्वी उद्योजकान कडून आपण आवश्यक असलेल्या गुणवत्तांचा बोध घेतला पाहिजे असे सांगितले . एसबीपीआयएमच्या स्थापने पासून ३५ विद्यार्थी उद्योजक झाल्याचे त्यांनी सांगितले. उदघाटनपर भाषणा मध्ये एमसीईडीचे विभागीय संचालक सुरेश उमाप यांनी सध्याच्या काळात उपलबद्ध असलेल्या व्यवसाय संधी , उद्योजकते साठी लागणाऱ्या शासकीय योजना यांची सविस्तर माहिती सांगून एमसीईडी करत असलेल्या कामाची माहिती दिली. याच कार्यक्रमात प्रकल्प अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी एमबीएच्या विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे न बनता , नोकरी देणारे उद्योजक बनून नवीन कल्पनांना मूर्त स्वरूप दिले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजक हेमंत भागवत यांनी उद्योजकते साठी आवश्यक असलेल्या गुणांची व क्षमतांची माहिती देऊन देशातील यशस्वी उद्योजकांची सविस्तर माहिती शिबिरार्थ्यांना दिली. सेवा निवृत्त बँक अधिकारी जी. एच. वाय. तिरंदाज यांनी उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल मिळवताना बँकेकडे करावयाच्या प्रस्तावाची आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कागद पात्रांची माहिती दिली. तेजस्विनी सवाई यांनी मार्केटिंग टूल्स, टेकनिकस आणि मार्केटिंग सर्व्हे विषयी प्रात्याक्षिका द्वारे सविस्तर माहिती दिली . आपल्या प्रोत्साहनपर भाषणामध्ये अशोक पत्तर यांनी उद्योजक बनण्या साठी विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या खुबी आवश्यक असतात आणि सध्याच्या काळात चौकटी बाहेरचा विचार करून विद्यार्थांनी उद्योजकतेत पदार्पण केले पाहिजॆ याविषयी विनोदी पद्धतीने मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड मधील यशस्वी उद्योजक दिगंबर सुतार यांनी एक होता कार्व्हर या कादंबरीचा परमार्थ घेऊन ते स्वतः कार्व्हरच्या आदर्शा मुळे आपल्या उद्योगात कसे यशस्वी झाले आणि अडचणी वर मात करून कसे ध्येय गाठले या बाबतचे त्यांनी विवचन केले. हेमंत भागवत यांनी सर्जनशीलता आणि नवनिर्मितता आपल्या उद्योगातून कशी करता येते हे उदाहरणा द्वारे सविस्तर सांगितले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्नाली कुलकर्णी व प्रा. अनुराधा फडणीस यांनी केले. डॉ. भूषण परदेशी आणि प्रा. ऋषिकेश कुमार यांनी संयोजन केले . तीन दिवसाचे हे उद्योजकता परिचय शिबीर यशस्वी रित्या पूर्ण केल्या बद्दल उद्योजकता विकास मंचाचे प्रमुख डॉ. हंसराज थोरात यांनी सर्वांचे आभार मानले.

induction
induction
induction

सांघिक समर्पण भावनेने तयार केलेली वास्तू अजरामर ठरते.....उदय कुलकर्णी, पीसीईटीच्या आर्किटेक्चर महाविद्यालयाचा स्वागत सभारंभ व कार्यशाळा संपन्न.

पिंपरी ( दि. 12 सप्टेंबर 17) उत्तम संघटन कौशल्य अंगी असणारा वास्तुविशारद उत्कृष्ठ कलाकृती निर्माण करु शकतो. सर्व घटकांनी सांघिक समर्पण भावनेने तयार केलेली वास्तू अजरामर ठरते असे मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तूविशारद (आर्किटेक्चर) उदय कुलकर्णी यांनी केले.

निगडीतील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अॅंड डिझाईन प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा व स्वागत सभारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यशाळेत पोस्टर मेकिंग आणि व्यक्तीमत्व विकास स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी यांनी संस्थेच्या 25 वर्षांच्या कार्यकालाचा आढावा घेतला. एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या उज्वला पळसुले, प्रा. शिल्पा पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. उदय कुलकर्णी यांनी स्लाईड शोव्दारे जागतिक वारसा लाभलेल्या वास्तूंचे सादरीकरण केले.

स्वागत प्रा. उज्वला पळसुले, सुत्रसंचालन तन्मय गोरक्ष आणि धनश्री पिच्चा, आभार प्रा. कविता पाटील यांनी मानले.

induction

अभियंत्यांनी अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करावे - रवी बोनापल्ली

पिंपरी ( दि. 10 सप्टेंबर 17) - अभियंत्यांनी मूलभूत ज्ञाना व्यतिरिक्त अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करुन देशाच्या सर्वांगिण विकासास हातभार लावावा असे प्रतिपादन मेटोर ग्राफिक्सचे रवी बोनापल्ली यांनी येथे केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या निगडी पीसीसीओईच्या इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन विभागात सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन मेंटॉर ग्राफिक्सचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर रवि बोनापल्ली यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अ. म. फुलंबरकर, कोरल टेक्नॉलाजीच्या मॅनेजर सादीया अर्शद, मयुर देशमुख, पीसीसीओईच्या विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. शितल भंडारी, डॉ. एन. बी. चोपडे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. जयंत उमाळे, अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे आदी उपस्थित होते. यावेळी पीसीईटी व कोरल टेक्नॉलॉजी, झायलिंग अँड मेंटोग्राफिक्स यांच्यात सांमजस्य करार करण्यात आला.

प्राचार्य डॉ. अ म फुलंबरकर म्हणाले संशोधन व निर्मितीच्या सहाय्याने समस्त मानवी जीवन कल्याणकारी व सुखकर होण्यासाठी अभियंत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सादिया अर्षद व डॉ. शितल भंडारी यांनी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या संदर्भातील करारनाम्यानुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करणार असल्याचे सांगितले. डॉ. चोपडे यांनी आतापर्यंतच्या बदलत्या तांत्रिक घडामोडी, भविष्यात या क्षेत्रात होणारे बदल व त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक अभियंत्यांची भुमिका याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. वर्षा बेंद्रे, प्रा. वर्षा हरपळे, प्रा. दिप्ती खुर्जे, प्रा. अंजली श्रीवास्तव, प्रा. मिना सोनार यांनी सहभाग घेतला. सुत्रसंचालन अनुष्का सिंग तर आभार प्रा. व्ही. एस. बेंद्रे यांनी मानले.

फोटो ओळी - निगडीतील पीसीसीओईमध्ये इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन विभागात सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन मेंटॉर ग्राफिक्सचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर रवि बोनापल्ली यांच्या हस्ते झाले.

induction

'पीसीसीओई'मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पिंपरी (दि. 13 ऑगस्ट 2017) निगडी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात गुरुवारी (दि. 17 ऑगस्ट ) "कॉम्प्युटींग, कम्युनिकेशन कंट्रोल ॲण्ड ॲटोमेशन" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक डॉ. सुदिप थेपडे, डॉ. सोनाली पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. आयईईई पुणे विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या परिषदेत भारतासह रशिया, युके, जपान, जर्मनी, ऑस्‍ट्रेलिया येथील विद्यार्थ्यांनी 1040 पेक्षा जास्त शोधनिबंध सादरीकरणासाठी दिले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्याहस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार असून सीडॅक मुंबईच्या सहसंचालिका डॉ. पद्मजा जोशी, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, डॉ. दिपक शिकारपूर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, संस्थेचे सचिव व्ही.एस.काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाटे आदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचा समारोप शुक्रवारी (दि.18) रोजी सायंकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

'टेक्नोव्‍हीजन इंडिया 2035' प्रकल्पाअंतर्गत ही आंतरराष्ट्रीय परिषद एकूण 60 सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. त्यापैकी शिक्षण, औद्योगिक क्षेत्रांशी संबंधीत 12 समांतर सत्र सादर करण्यात येणार आहेत.
उद्योग व रोजगारांसाठी जागतिक दर्जाच्या अनेक संधी...दिनेश अंनतवार

रावेत येथील पिंपरी चिंचवड इंजिनिअरींग कॉलेज ॲन्ड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचा स्वागत सभारंभ पिंपरी (दि. 11 ऑगस्ट 2017) जागतिक स्तरावरील खुल्या व्यापारी धोरणामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना उद्योग व रोजगारांसाठी जागतिक दर्जाच्या अनेक संधी खुणावत आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात जरी बदल झाले तरी मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान देवाणघेवाणसाठी विकसनशील आणि विकसित राष्ट्रांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागणार आहे. इस्त्रो सारख्या संस्थेने तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या माध्यमातून भारताला जागतिक स्तरावर वैभवशाली टप्पा गाठण्याचे ध्येय प्राप्त करुन दिले. पुढील काळात उच्च शिक्षित व कुशल मनुष्यबळ भारतात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे. त्यातूनच संशोधक, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ घडतील आणि भारत देश विकसित राष्ट्राकडे वेगाने वाटचाल करील असा आशावाद ज्येष्ठ समुपदेशक व सल्लागार दिनेश अनंतवार यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पीसीसीओईआरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या स्वागत सभारंभाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन पीसीईटीचे खजिनदार शांताराम गराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त भाईजान काझी, माजी मंत्री व विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्रशासन अधिकारी पद्माकर विसपुते, प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरिश तिवारी, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाटे, सेंट्रल प्लेसमेंट अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे, प्रा. सोनाली कणसे, पालकप्रतिनिधी प्रार्थो बॅनर्जी आदी उपस्थित होते.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले महिमा चंदणे, चिन्मयी चिटणीस, आरती शर्मा, अभिजीत नेमाडे, कृणाल पाटील, जयेश पिंपळशेंडे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विश्वस्त भाईजान काझी, प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर, प्राचार्य हरिष तिवारी, प्रा. शितलकुमार रवंदळे यांनी देखिल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. संदीर बोरगावकर यांनी महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणा-या सुविधांची माहिती दिली. स्वागत प्रा. सोनाली कणसे, प्रा.दिपशीखा श्रीवास्तव यांनी सूत्र संचालन, संयोजन व आभार प्रा. प्रिया ओघे यांनी मानले.

फोटो ओळ : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पीसीसीओईआरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या स्वागत सभारंभाचे उद्‌घाटन खजिनदार शांताराम गराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरिश तिवारी, सेंट्रल प्लेसमेंट अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे, प्रा. सोनाली कणसे आदी.

induction
induction